... तर शेतकऱ्यांसारखे विद्यार्थी आत्महत्यांचे सत्र सुरू व्हायला वेळ लागणार नाही ! गेल्या अनेक दिवसांपासून पुणे विद्यापीठ ज्या पद्धतीने काम करत आहे त्यावर एक साधी नजर टाकली तरी सगळे वास्तव समोर येईल . नावाजलेले विद्यापीठ म्हणून पुणे विद्यापीठाची ख्याती आहे . लांबून लांबून विद्यार्थी पुणे विद्यापीठामध्ये प्रवेश मिळावा यासाठी कष्ट करतात. पुण्यामध्ये आणि पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी अक्षरशः जीव ओततात पण इथले वास्तव बुध्दीला मुंग्या आणणारे आहे . पुणे विद्यापीठात गोंधळ आहे ,चुकीच्या निर्णयांचे लोंढे आहेत . पैशाचा, वेळेचा अपव्यय आहे आणि अनेकांच्या आयुष्याशी सुरू असलेला खेळ आहे हे तुम्हाला मान्य करावच लागेल . पुणे विद्यापीठ म्हणून दर्जा ढासळला आहे . ढिसाळ कारभार , शिक्षणाचा आणि शिक्षकांचा ढासळलेला दर्जा , कॉपी आणि परीक्षेतील गोंधळामुळे निर्माण झालेली बजबजपुरी हेच ईथले भयानक वास्तव आहे . पुणे विद्यापीठामध्ये चालणारे काम प्रचंड सावकाश आहे . ऑनलाईन व्यवहारांचा नुसता आव आणला आहे पण कामाची गती खूप कमी आहे . विद्यार्थ्याला...
मराठी मातीच्या वैभवासाठी , मानवी मनाच्या भरणपोषणासाठी , संवेदनांची आणि पर्यायाने सृजनाची हळुवार पेरणी करण्यासाठी 'इर्जिक'!... शेतीमातीच्या भावभावना , ज्वारी बाजरीच्या ताटाची ऐट , घुंगरमाळांचा आवाज , नांगराच्या चाकाची किरकिरगितं , गावरान मधाळ बोली , प्राणी पाखरांच्या सुखावणाऱ्या हालचाली सारं काही जपण्यासाठी 'इर्जिक'!....शेतातली भलरी , श्रावणाच्या सरी , लग्नाचे मांडव , लाजरी बुजरी नवरी , वारी आणि वारकरी , मृदंगाचे निनाद , काकडारतीचे रम्य सूर हे सारं काही जपून ठेवण्यासाठीची 'इर्जिक'! ....