Skip to main content

Posts

Showing posts from March, 2020

करोना, law of survival of fittest आणि वर्गसंघर्ष

कोरोनाच्या निमित्ताने देशभर एक मोठं संकट घोंगावत असताना फार वेळ मिळाला आहे प्रत्येकाला आत्मशोध घेण्यासाठी. अर्थात किती जण हा वेळ आत्मशोधासाठी वापरताहेत हा शोधाचाच विषय. असो. मुळात हे संकट भारत देश अशिक्षित, अडाणी, अंधश्रद्धा युक्त, गरीब आणि भयानक आर्थिक विषमता असलेला आहे. त्यामुळे या सगळ्यांचा एकत्रितपणे परिणाम या संकटाची दाहकता वाढवतो. सगळीकडे कर्फ्यु असताना सायकलवर गावाकडे परत चाललेलं एक तरुण मजूर जोडपं एका वृत्तवाहिणीवर दिसलं. त्यात त्यांची एक मुलगी त्या स्त्रीकडे मागे कडेवर होती आणि एक बाळ पुढे सायकलच्या नळीवर बसलेलं. झोपी गेलेल्या त्या बाळाने आपलं मुंडकं हँडलवर टेकवलं होतं. त्याला हादरे बसू नये म्हणून, खड्ड्यामुळे आदळू नये म्हणून त्याचा बाप त्या डोक्याखाली हँडलवर केवळ एक टॉवेलची घडी ठेऊ शकत होता. त्याकडे हजार अकराशे किलोमीटर सायकलवर प्रवास करण्याखेरीज दुसरा उपाय नव्हता. माणसाने स्वतःच्या सुखासाठी सुरू केलेला खेळ आता असा माणसाच्या जीवावर बेततो आहे. यंत्र बनून स्पर्धेत फिरण्याशिवाय आता दुसरा मार्ग उरलेला नाही. गेलं एक वर्ष भारतावर आणि काही अंशी जगावर आर्थिक मंदीचं सावट आहे. ...