ना इथे विज्ञानाचे धरबंध असतात ना धार्मिकतेचा उन्माद, इथे फक्त हरेकाला सुखावणाऱ्या परंपरा, चालीरीती वाहत असतात. इथलं जीवन निसर्गाशी घट्ट बांधलेलं असतं. निसर्गावर अवलंबून असलं तरी परस्परपूरक असतं. प्रत्येक ऋतूनुसार इथल्या संस्कृतीचा नवा थाट असतो. साज असतो. आज शेतीमध्ये आधुनिकतेने अतिक्रमण केलं असलं तरी जुनी संस्कृती झाकून राहिलेली नाही. ती कधीतरी पुन्हा उगवते. जुने संदर्भ पुन्हा जागे होतात. त्यात भयानक दुःखही असतं पण माणूस नेहमी जुन्या गोष्टींमध्ये फार सुख होतं असं म्हणतो. गतवैभवाच्या स्वप्नांमध्ये रमतो. कितीही पुढे गेलो तरी रस्ता संपत नाही, नवीन वाटा खुणावतच राहतात याचा शीण येत असावा माणसाला! म्हणून तो गतवैभवाच्या स्वप्नांनी स्वतःच्या हृदयाच्या कप्प्यात आनंदाचे प्रवाह साठवत असतो. पूर्वी बैलगाडीने वऱ्हाड नेलं जायचं. बाजार, व्यापार देखील बैलगाडीनेच चालायचा. लांबचा प्रवास देखील बैलगाडीनेच. अगदी मोटारींच्या शोधानंतरसुद्धा काही काळ या बैलगाडीने रस्त्यांवर राज्य केलंय. मोटारी सामान्य माणसाच्या हातात येईपर्यंत बैलगाड्यांनी फार अंतर कापलं होतं. गावापासून दूर व्यापाराला, प्रवासाला जातान...
मराठी मातीच्या वैभवासाठी , मानवी मनाच्या भरणपोषणासाठी , संवेदनांची आणि पर्यायाने सृजनाची हळुवार पेरणी करण्यासाठी 'इर्जिक'!... शेतीमातीच्या भावभावना , ज्वारी बाजरीच्या ताटाची ऐट , घुंगरमाळांचा आवाज , नांगराच्या चाकाची किरकिरगितं , गावरान मधाळ बोली , प्राणी पाखरांच्या सुखावणाऱ्या हालचाली सारं काही जपण्यासाठी 'इर्जिक'!....शेतातली भलरी , श्रावणाच्या सरी , लग्नाचे मांडव , लाजरी बुजरी नवरी , वारी आणि वारकरी , मृदंगाचे निनाद , काकडारतीचे रम्य सूर हे सारं काही जपून ठेवण्यासाठीची 'इर्जिक'! ....