ना इथे विज्ञानाचे धरबंध असतात ना धार्मिकतेचा उन्माद, इथे फक्त हरेकाला सुखावणाऱ्या परंपरा, चालीरीती वाहत असतात. इथलं जीवन निसर्गाशी घट्ट बांधलेलं असतं. निसर्गावर अवलंबून असलं तरी परस्परपूरक असतं. प्रत्येक ऋतूनुसार इथल्या संस्कृतीचा नवा थाट असतो. साज असतो.
आज शेतीमध्ये आधुनिकतेने अतिक्रमण केलं असलं तरी जुनी संस्कृती झाकून राहिलेली नाही. ती कधीतरी पुन्हा उगवते. जुने संदर्भ पुन्हा जागे होतात. त्यात भयानक दुःखही असतं पण माणूस नेहमी जुन्या गोष्टींमध्ये फार सुख होतं असं म्हणतो. गतवैभवाच्या स्वप्नांमध्ये रमतो. कितीही पुढे गेलो तरी रस्ता संपत नाही, नवीन वाटा खुणावतच राहतात याचा शीण येत असावा माणसाला! म्हणून तो गतवैभवाच्या स्वप्नांनी स्वतःच्या हृदयाच्या कप्प्यात आनंदाचे प्रवाह साठवत असतो.
पूर्वी बैलगाडीने वऱ्हाड नेलं जायचं. बाजार, व्यापार देखील बैलगाडीनेच चालायचा. लांबचा प्रवास देखील बैलगाडीनेच. अगदी मोटारींच्या शोधानंतरसुद्धा काही काळ या बैलगाडीने रस्त्यांवर राज्य केलंय. मोटारी सामान्य माणसाच्या हातात येईपर्यंत बैलगाड्यांनी फार अंतर कापलं होतं. गावापासून दूर व्यापाराला, प्रवासाला जाताना काही थांबे ठरलेले असायचे. तिथे शक्यतो प्रत्येक प्रवासी, व्यापारी, वाटसरू थांबणार म्हणजे थांबणार. इथे एखादं वडाचं, आंब्याचं किंवा भल्या मोठ्या पिंपळाचं झाड असायचं. अशी जागा साधारण गावापासून थोडी दूर असायची. घाटाच्या सुरुवातीला पायथ्याशी किंवा एखाद्या मंदिराच्या प्रांगणात अशी सोयच केलेली असायची. त्या शेजारीच एक आडवजा विहीर आणि त्यावर सार्वजनिक रहाट. काही वेळेला पाणी काढण्यासाठी सोय असायची काही वेळेला नसायची. पण शक्यतो प्रवासाला निघताना मोठं दावं, एक बादली, बैलांसाठी वैरण, पाण्यासाठी एखादं छोटं भांडं एवढं सोबत असणारच. सोबतीला कारभारीन दशम्या करून देणारच. आजही जुनी माणसं प्रवासाला निघताना घरून या दशम्या घेतातच. त्यामध्ये फार प्रेम जाणवतं. या दशम्या म्हणजे जुन्या काळच्या रोमांसचा बेंचमार्कच!
या झाडाखाली मग दुपारच्या वेळेला सगळ्या गाड्या सुटायच्या. बैलांना वैरण टाकली जायची. गर्द सावलीत अशा ओळखी अनोळखी माणसाचं गावच जणू वसायचं. काही काळासाठी. साधारण पाच पन्नास माणसं कवेत घेईल असं हे झाड म्हणजे वाटसरूला कल्पवृक्षच वाटावा! गार सावलीला आपापल्या गाडीशेजारी माणसं न्याहारीला बसायची. घरून बांधून दिलेली कोरड्यास भाकर खायची. एखाद्याकडे जेवण नसेल तर तोही इथे सपादून जायचा. 'या पाव्हनं, वाईज भाकर खावा की, लै एकलं एकलं बसल्यात तुमि. मला काय जाती व्हय एवढी भाकर, या उलशिक खाऊ लागा' असं म्हणून अगदी आपलेपणाने इथं माणसं आनंदाचे दोन घास खायची. ओळखी व्हायच्या. क्षेमकुशल विचारलं जायचं. सुख दुःख वाटून घेतलं जायचं.
अनेकदा अशाच विसाव्यासाठी थांबलेल्या झाडाखाली सोयरिकी जुळायच्या. निसर्गाने घडवून आणलेल्या या नात्यांना ही संस्कृती केवढी घट्ट बांधून ठेवत असेल नाही! एखादवेळी वयात आलेल्या पोरा पोरींची इथे नजरानजर व्हायची. त्याकाळी आपलं हे नवीन पालवीसारखं प्रेम व्यक्त बिक्त करायची पद्धत नव्हती . डोळे वर करून एकमेकांना पाहायला सुद्धा विचार करावा लागायचा. फार हिम्मत असलेले युगुल हिंमतीने भेटायचे. प्रेमविवाह वगैरे व्हायचे. अगदी क्वचितच. प्रेमविवाह करणारे त्या काळी औषधालाही सापडत नसायचे. 'सखाराम पाटलाची पोर हाय ब्वा, पोर चांगली हे, बघतो गेलो का ईशय काढतो त्यासनी' असे निरोप जायचे. बैठका व्हायच्या.
अचानक अशा प्रवासात मायलेकींची भेट व्हायची. कुठलाही काही संकेत नसताना झालेल्या या भेटी म्हणजे आनंदाचा महोत्सवच! डोळे भरून माय लेकी भेटायच्या, सुख दुःखाच्या गप्पा मारायच्या. एकत्र जेवताना माय मात्र लेकीकडे नुसती बघत राहायची. पोटचा गोळा सुखात असेल ना ही चिंता आईला असतेच नेहमी. पुन्हा गावाकडे निघताना मात्र मायलेकी हंबरडा फोडायच्या. काळ क्रूर असतो, कधी थांबत नाही. तुमचे आक्रोश ऐकायला त्याला वेळ नसतो.
उन्हं उतरल्यावर तोंडावर पाणी मारायचं, राज्या परधान्याला पाणी दाखवायचं आणि गाड्या जुंपायच्या. घर जवळ करायचं. इथं झाडाखाली हे असं वर सांगितल्याप्रमाणे सगळं आलबेल सुरू असतंच असं नाही बरका. काही वेळेला इथं चोऱ्या व्हायच्या, भांडणं व्हायची. अगदी कोयते कुऱ्हाडी उपसल्या जायच्या. माणसाच्या मेंदूवर एकदा संताप स्वार झाला की माकडं बरी अशी अवस्था. वाद असलेले पाटील लोक तर एकमेकांकडे नुसते डूख धरून बघायचे. इथे गावच्या राजकारणाचा आणि त्यातल्या संघर्षाची आग देखील जाणवायची. अशा झाडाखाली जर बायकांची जुंपली तर मात्र पुरुषवर्गाची अक्कल बंद! इथं बैलांची गायची झुंज लागली तर मात्र अख्या प्रवासाचा खेळखंडोबा व्हायचा. मोक्कार मोठाले बैल च्यायला कोण मधी पडणार यांच्या. त्यांना आवरता आवरता नाकी नऊ यायचे मालकाच्या. शिवाय आसपासच्या मालाची नासधूस व्हायची ती वेगळीच.
'हा सांगा बरं काय किंमत असेल ह्या कारवडीची?' नुकताच बाजारातून आलेला पाहून टापात प्रश्न करणार. मग बाकीचे अंदाज सांगणार. आणि हा पाहुणा जिंकल्याचा अविर्भावात कालवड कशी स्वस्तात मिळाली त्याच्या गप्पा सांगणार. इथे पत्ते, जुगारदेखील रंगायचे. काही वेळेस इथे चक्क कुस्त्या व्हायच्या. ईनाम लावले जायचे. पेपर वाचणाऱ्या मंडळींना इथे विशेष मान मिळायचा. देशोदेशीच्या घडामोडी लोक त्याच्या तोंडून ऐकत. कधी कधी ब्राह्मण काकांना दक्षिणा देऊन भविष्य देखील बघितलं जायचं. लग्न जुळविली जायची. हे सगळं प्रवासात व्हायचं. केवळ ऊन उतरेपर्यंत या झाडाखाली हजार व्यवहार झालेले असायचे. सारं काही निखळ आनंददायी होतं.
गावात देखील उन्हाळ्यात अशाच झाडाखाली लोक गुरं आणून बांधत. पारावर गप्पा ठोकत बसत. अमक्या चांभारानी पाटलाला लै शिव्या दिल्या, इस्वासनानांनी लै जबर बैल आणलाय, येसवंता ला औंदा चांगली जवारी झाली अशा गप्पा चालायच्या. गावगाड्याच्या संस्कृतीचा हा पार एक महत्वाचा भाग असे. इथेच पाडव्याची सोंगं व्हायची, इथेच यात्रा,जत्रा आणि इथेच तमाशा व्हायचा. सगळं या पाराने अनुभवलेलं असायचं. पारावरची माणसं काळाआड जायची,नवी यायची. येत राहतील असा विश्वास त्याला होता पण पारापासून माणसं कायमची दूर जातील असं त्याला कधीच वाटलं नसेल!
-अजिंक्य
( गावगारवा या सदरात आपण गावाकडे असलेल्या चालीरीती प्रथा परंपरा, ग्रामसंस्कृती, ऋतू, सण, उत्सव आणि एकूणच ग्रामजीवनाचा मागोवा घेणार आहोत. ही माहिती प्रवास, अनुभव आणि मुलाखतींमधून संकलित केलेली आहे.)

Comments
Post a Comment