Skip to main content

Posts

Showing posts with the label गझल

कवितेच्या गावा जावे -२

एक तू आहेस दोस्ता ,जिंदगी समशान होती जागला स्वाभिमान दोस्ता जिंदगी अपमान होती... पत्थरांना तोंड द्याया उघडी आहे आज छाती चिरन्या अंधार माझी जिंदगी तेव्हा म्यान होती .... एक तू आलास इकडे दुश्मनांनी बदलली नीती तो शिव्यांचा भडिमार अन जिंदगी गुमनाम होती ... आज मी चालतो अन समोर झडतात मुजरे रथाचे निखळले चाक अन जिंदगी गतप्राण होती ... वाट होती थेट होती सावली घनदाट होती हरवले होते धुके अन जिंदगी निष्प्राण होती ... जोडले उभारले तू राज्य हे माझे तुझे काळ होता थांबला अन जिंदगी सामान होती ... आजची गती ,आज ती प्रीती ,आज बघ फुटले धुमारे पराभूत त्या रात्री होत्या एकतर्फी अजान होती ...                   -ajinkya