Skip to main content

Posts

Showing posts with the label पाणतास

गावपण भाग ७ : पाणतास

 भारी , भन्नाट शब्द आज आपण शिकणार आहोत . आता पाणतास शब्द ज्यांना माहित आहे त्यांच्या मनाला थोडासा गारवा जाणवला असेल . गारव्याचे कारण असे कि पाणतास म्हणजे शेतातलं पाणी बाहेर काढून टाकण्यासाठी खोदण्यात आलेला चर .  गावाकडे तास म्हणजे अजून एक वेगळा अर्थ आहे . शेतात बैलांच्या सहाय्याने काम करताना एका बाजूने नांगरत , पेरत , पाळी घालत किंवा कोळपत जाताना जेवढी जमीन उकरली जाते त्या सरळ पट्ट्याला तास म्हणतात . म्हणून पाणी  + तास = पाणतास (पाणी काढून देण्यासाठीचा तास ) असा शब्द तयार झाला .   या पाणतासाच्या जवळ जाणारा 'पाणंद' असा अजून एक शब्द आहे पण त्यावर आपण नंतर एखाद्या लेखात सविस्तर बोलू .   पाणतासाचा आणि आमचा संबंध शक्यतो उन्हाळ्यात यायचा . एरवी पाणतास हि प्रचंड अडचणीची , अनेक झाडाझुडपांनी आणि वेलींनी आच्छादलेली  त्यामुळे तिकडे जाण्याची कुणाची हिम्मत नसते . सर्व झाडांची एकत्रित वाढण्याची स्पर्धा असते . यात मात्र कावळीचा , गुळवेलाचा , नागिणीचा , असे अनेक वेल असतात . या गर्दीत गम्मत अशी होते कि या वेली सर्वांवर बाजी मारतात . झाडा...