Skip to main content

Posts

Showing posts with the label भारत

प्रासंगिक भाग 4

गोडवा भारतीय सणांचा :वटपौर्णिमा भारतीय संस्कृती आपल्याला निसर्गमय करून टाकते .निसर्गाकडे नव्या नजरेने बघायला शिकवते . याच अनुषंगाने भारतीय सण उत्सव साजरे होतात . अगदी प्रत्येक सणाचा संबंध ऋतुमानानुसार आपल्या आरोग्याशी देखील जोडलेला आढळून येतो . असाच प्रत्येक स्त्रीच्या भावविश्वातला महत्वाचा सण म्हणून वटपौर्णिमा साजरी केली जाते . वडाच्या झाडाची पूजा यानिमित्ताने महिला मंडळी बांधतात . या सणाच्या निमित्ताने सगळ्या स्त्रिया एकत्र येतात ,हितगुज करतात आणि यातून नवे ऋणानुबंध वृद्धिंगत होतात . भारतीय संस्कृतीचा केवढा हा गोडवा !          जिथे श्रद्धेचा अतिरेक होतो तिथे अंधश्रद्धेचा उगम झालाच म्हणून समजा . मूळ उद्देशापासून जेव्हा आपण दूर जातो तेव्हा मात्र अंधश्रद्धेकडे झुकण्याचा धोका जास्त असतो . वटपौर्णिमा देखील अनेक अंधश्रद्धांच्या विळख्यात सापडली आहे . या चुकीच्या समजुती दूर सारून जर मूळ उद्देश समजावून घेतला तर हे सण आपल्या आयुष्यातील सुंदर काळ असतील . या सणांच्या निमित्ताने महिला गावातल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली जमतात . तिथे हळद कुंकू वाहून म...