मैत्री दिनाच्या निमित्ताने .... मैत्री माणसांशी, आपली भाषा कळत नसलेल्या लोकांशी, मैत्री निसर्गाशी, दगडांशी, डोंगराशी, पाण्याशी, रस्त्यावरल्या मातीशी, गाडीच्या चाकामुळे उधळलेल्या धुळीशी, चंद्र चांदण्यांशी ,अनोळखी चेहऱ्यांशी ,पाऊल ठशांशी ,तृणपर्णावरल्या मोत्यांशी ,अंगाखांद्यावर यथेच्छ लोळू दिलेल्या बैल जोडीशी ,मैत्री असंख्य जणांशी.... मैत्री हळुवार हृदयाला भिडलेल्या व्यक्तित्वाशी ,सागराच्या लाटेशी, उधळलेल्या रस्त्याशी ,पिकलेल्या पानाशी अन सुकलेल्या गुलाबाशी ....मैत्री स्वतःशी ,मैत्री अद्वैताशी ,विज्ञानाशी ,गणिताशी...मैत्री ओंकाराशी ...मैत्री निर्मितीसत्वाशी ... मैत्री हे खरंच अजब रसायन एकमेकांसाठी जगण्यात एकमेकांशिवाय काहीच नसतं . मैत्री कोणाशी देखील होऊ शकते. मैत्रीमध्ये कसलेही बंधन नसते . अगदी उजाड माळरानाशी देखील मैत्री होते . फ्रेंडशिप इज वन सोल इन टू बॉडीज असं म्हटलं जातं. खरं दोन जीवांमध्ये असलेल्या एका आत्म्याचं वास्तव्य म्हणजे मैत्री . यासाठी दोघांचे विचार सारखे असावेत असं नाही . फक्त एकमेकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी एकदा धडपड सुरू झाली की मैत्रीचं नातं फु...
मराठी मातीच्या वैभवासाठी , मानवी मनाच्या भरणपोषणासाठी , संवेदनांची आणि पर्यायाने सृजनाची हळुवार पेरणी करण्यासाठी 'इर्जिक'!... शेतीमातीच्या भावभावना , ज्वारी बाजरीच्या ताटाची ऐट , घुंगरमाळांचा आवाज , नांगराच्या चाकाची किरकिरगितं , गावरान मधाळ बोली , प्राणी पाखरांच्या सुखावणाऱ्या हालचाली सारं काही जपण्यासाठी 'इर्जिक'!....शेतातली भलरी , श्रावणाच्या सरी , लग्नाचे मांडव , लाजरी बुजरी नवरी , वारी आणि वारकरी , मृदंगाचे निनाद , काकडारतीचे रम्य सूर हे सारं काही जपून ठेवण्यासाठीची 'इर्जिक'! ....