एक तू आहेस दोस्ता ,जिंदगी समशान होती जागला स्वाभिमान दोस्ता जिंदगी अपमान होती... पत्थरांना तोंड द्याया उघडी आहे आज छाती चिरन्या अंधार माझी जिंदगी तेव्हा म्यान होती .... एक तू आलास इकडे दुश्मनांनी बदलली नीती तो शिव्यांचा भडिमार अन जिंदगी गुमनाम होती ... आज मी चालतो अन समोर झडतात मुजरे रथाचे निखळले चाक अन जिंदगी गतप्राण होती ... वाट होती थेट होती सावली घनदाट होती हरवले होते धुके अन जिंदगी निष्प्राण होती ... जोडले उभारले तू राज्य हे माझे तुझे काळ होता थांबला अन जिंदगी सामान होती ... आजची गती ,आज ती प्रीती ,आज बघ फुटले धुमारे पराभूत त्या रात्री होत्या एकतर्फी अजान होती ... -ajinkya
मराठी मातीच्या वैभवासाठी , मानवी मनाच्या भरणपोषणासाठी , संवेदनांची आणि पर्यायाने सृजनाची हळुवार पेरणी करण्यासाठी 'इर्जिक'!... शेतीमातीच्या भावभावना , ज्वारी बाजरीच्या ताटाची ऐट , घुंगरमाळांचा आवाज , नांगराच्या चाकाची किरकिरगितं , गावरान मधाळ बोली , प्राणी पाखरांच्या सुखावणाऱ्या हालचाली सारं काही जपण्यासाठी 'इर्जिक'!....शेतातली भलरी , श्रावणाच्या सरी , लग्नाचे मांडव , लाजरी बुजरी नवरी , वारी आणि वारकरी , मृदंगाचे निनाद , काकडारतीचे रम्य सूर हे सारं काही जपून ठेवण्यासाठीची 'इर्जिक'! ....