एकीकडे 1857 नंतर भारतात पुन्हा सशस्त्र क्रांती होऊ नये यासाठी इंग्रज सरकार दक्षता घेत होते तर दुसरीकडे पुन्हा याच इंग्रज सरकारला सशस्त्र आणि जहाल क्रांतीच्या माध्यमातून टक्कर द्यायला अनेक क्रांतिकारक सज्ज झाले होते. त्यापैकीच एक 'लोकमान्य बाळ गंगाधर टिळक' .समाजसुधारक, राष्ट्रीय नेता ,पत्रकार, संस्कृतज्ञ तसेच गणित, खगोलविज्ञान यांचा गाढा अभ्यासक असलेले लोकमान्य टिळक जनमानसात प्रसिद्ध असलेले नेता होते . त्यांनी राबवलेले उपक्रम जनमानसात रुजले आणि एक प्रबळ राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच हा त्यांचा नारा सबंध भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत महामंत्र बनून गेला . या नाऱ्यामधून प्रत्येकाला आपल्या हक्कांची जाणीव होत होती आणि ते हक्क मिळवण्याचा अधिकार आहे अशी उर्मी त्यांच्यामध्ये निर्माण होत होती .याचाच परिपाक म्हणून अनेक तरुण अबाल वृद्ध कार्यकर्ते राष्ट्रीय चळवळीत जोडले गेले. त्यांच्या योगानाबद्दल त्यांनालोकमान्य ही पदवी दिली गेली.
रत्नागिरीमध्ये चिखली या गावात त्यांचा जन्म झाला . त्यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते .त्यांचे वडील गंगाधर हे संस्कृत पंडित होते . लोकमान्य टिळकांना लहानपणापासूनच पुस्तक वाचनाची आवड होती. त्यांचे विचार लहानपणापासूनच स्पष्ट होते. कर्तव्यनिष्ठता आणि राष्ट्रभक्ती त्यांच्या अंगी भिनली होती . ते दहा वर्षांचे असताना त्यांची आई त्यांच्या आईचे निधन झाले तर सोळा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले .अत्यंत खडतर परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले .त्यांनी एलएलबीची पदवी देखील घेतली.
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी त्यांनी अनेक कार्यक्रम राबवले .समाजामध्ये एकजुटीची भावना निर्माण करण्यात यशस्वी झाले .देशावरची आपत्ती ही आपली आपत्ती आहे अशी भावना जनमानसात रुजल्यामुळे क्रांतिकारक चळवळ प्रबळ झाली.
अठराशे सत्तावनच्या उठावाअगोदर म्हणजेच 1856 मध्ये त्यांचा जन्म झाला होता त्यामुळे 1857च्या क्रांतीची झळ त्यांना देखील बसली होती .त्यांच्या आजोबांनी त्यांच्या मधली राष्ट्रप्रेम प्रेमाची भावना जागृत केली. अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्यसमरातील अनेक गोष्टी त्यांना सांगितल्या .त्यामुळे अगदी लहान वयात त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले.
स्वदेशी ,स्वराज्य ,विदेशी वस्तूंचा त्याग, आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीने त्यांनी आपलं काम सुरु केलं.पुढे याच तत्वांचा अंगीकार करून महात्मा गांधींनी मोठे आंदोलन उभे केले . देशाच्या समस्यांवर टिळकांनी चिंतन केलं आणि त्यातूनच त्यांना देशसेवा करण्याची प्रेरणा मिळाली .आपले वेद आणि उपनिषदांमधील आदर्श तत्त्वज्ञान तसंच त्यातलं मूल्यशिक्षण बाजूला सारून इंग्रजी शिक्षण पद्धती आपल्याला निष्क्रिय करत आहे हे त्यांनी ओळखलं .त्यांनी स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षणाचा आग्रह धरला. इंग्रजी शिक्षण हे फक्त इंग्रजी लिपिक घडवण्यासाठी दिले जाते असं ते सांगत. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या सोबत डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली .यामधून मुलांना भारतीय संस्कृती भारतीय तत्वज्ञान शिकवलं गेलं.
टिळक एक द्रष्टा पत्रकार होते. त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सरकारवर सडकून टीका केली. सरकारच्या धोरणांमधला फोलपणा पुढे आणला. पत्रकारितेला त्यांनी एखाद्या हत्यारा प्रमाणे वापरलं. मराठा आणि केसरी वृत्तपत्र त्यावेळी जनमानसाच्या भावभावनांचे मुखपत्र होते. या वृत्तपत्रातल्या संपादकीय लेखांमुळे त्यांना अनेक वेळा जेलमध्ये जावं लागलं.पण तरीही ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?’असा प्रश्न केवळ आणि केवळ टिळकच विचारू शकत होते .
या वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय क्रांतिकार्याचे चित्रण केले. भारतीयांच्या समस्यांवर प्रकाश टाकला . लोकमान्य टिळकांनी दलितांसाठी देखील काम केलं. बालविवाह तसेच अनेक अनिष्ट प्रथांचा विरोध केला. त्यांनी विधवाविवाहाचे समर्थन केले. त्या काळात हे विचार नव्या युगाची पहाट होते. इंग्रजांनी स्थापन केलेल्या काँग्रेसमध्ये संपूर्ण स्वराज्य मागण्याची ताकद नव्हती आणि याच वेळेस ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच!!!’ या टिळकांच्या वाक्यांमुळे 19929 साली संपूर्ण स्वातंत्र्याचा प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाले .ते 1890 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य झाले . याशिवाय अनेक संस्थांचे ते सदस्य होते .अनेक संस्थांच्या रचनात्मक बांधणीमध्ये टिळकांचा सिंहाचा वाटा होता .
राष्ट्रापुढच्या समस्यांवर तरुणांनी एकत्र येऊन विचार करावा यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली .गणेश हे श्रद्धेचे प्रतीक तर छत्रपती शिवाजी महाराज हे व्यवस्थेचे प्रतीक! या दोन उत्सवांमधून आपापसातले भेदभाव भांडण विसरून समाज एकत्र झाला आणि एक नवी राष्ट्रीय चळवळ उभी राहिली.
22 जून 1897 मध्ये रँड या इंग्रजी अधिकाऱ्याचा चाफेकर बंधू यांनी खून केला. भारतामध्ये भूकबळींची संख्या वाढली होती अशातच प्लेगच्या साथीमुळे हजारो लोकांचे प्राण जात होते आणि रँडसारख्या जुलमी अधिकाऱ्यांनी या वेळी भारतीय नागरिकांवर अमानुष अत्याचार केले. महिलांचे विनयभंग, बलात्कार या गोष्टींना जनता वैतागली होती आणि यातूनच रँडचा वध झाला .या गोष्टीचे समर्थन केल्याबद्दल टिळकांना तुरुंगवास भोगावा लागला .पण तोपर्यंत काँग्रेस जनमानसात रुजवण्याचे यशस्वी झाले होते.
लाला लजपत राय बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या तिघांना एकत्रितपणे लाल-बाल-पाल म्हटलं जायचं 1911 साली बंगालची फाळणी फाळणी रद्द करण्यात यांचा मोठा वाटा होता.
टिळकांनी आपल्या आयुष्यात तीन मोठे कारावास भोगावे लागले . 30 एप्रिल 1908 मध्ये मुझफ्फरपूर येथे खुदीराम बोस यांनी बॉम्ब फेकला याचे समर्थन केल्याबद्दल लोकमान्य टिळकांना सहा वर्षे कारावासाची शिक्षा झाली .त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला भरला होता .यासाठी त्यांना मंडालेच्या तुरुंगात पाठवण्यात आले .या तुरुंगात मात्र त्यांनी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग केला. लेखन , चिंतन आणि अभ्यास करून त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला .या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी साहित्यविश्वात दिलेले योगदान उल्लेखनीय आहे .1914 मध्ये ते तुरुंगातून मधून बाहेर आले आणि ‘पुनश्च हरिओम’ नावाचा संपादकीय लेख लिहिला . पुन्हा एकदा नव्या टिळक युगाला सुरुवात झाली .देशसेवेसाठी आयुष्य वाहून घेणे ते याला म्हणतात . एक क्षणभरही त्यांचा देशसेवेचा विचार कमी होत नव्हता .
ऍनी बेझंट आणि मोहम्मद अली जिना यांच्या सहकार्याने त्यांनी होमरूल लीगची स्थापना केली . यामागे देखील संपूर्ण स्वराज्य हाच हेतू होता . अशा प्रकारे भारतमातेसाठी अव्याहतपणे लढणाऱ्या या लढवय्या नेत्याचे १ ऑगस्ट १९२० रोजी निधन झाले. लोकमान्य टिळक हे आधुनिक भारताचे निर्माते होते अशी भावना मोहनदास करमचंद गांधी व्यक्त केली .खऱ्या अर्थाने टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतला सिंह होते.
-अजिंक्य
Comments
Post a Comment