Skip to main content

Posts

Showing posts with the label pune

लोकमान्य टिळक एक जहाल झंजावात….

एकीकडे 1857 नंतर भारतात पुन्हा सशस्त्र क्रांती होऊ नये यासाठी इंग्रज सरकार दक्षता घेत होते तर दुसरीकडे पुन्हा याच इंग्रज सरकारला सशस्त्र आणि जहाल क्रांतीच्या माध्यमातून टक्कर द्यायला अनेक क्रांतिकारक सज्ज झाले होते.  त्यापैकीच एक 'लोकमान्य बाळ गंगाधर टिळक' .समाजसुधारक, राष्ट्रीय नेता ,पत्रकार, संस्कृतज्ञ तसेच गणित, खगोलविज्ञान यांचा गाढा अभ्यासक असलेले लोकमान्य टिळक जनमानसात प्रसिद्ध असलेले नेता होते  . त्यांनी राबवलेले   उपक्रम जनमानसात रुजले आणि एक प्रबळ राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच हा त्यांचा नारा सबंध भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत महामंत्र बनून गेला . या नाऱ्यामधून प्रत्येकाला आपल्या  हक्कांची जाणीव होत होती आणि ते हक्क मिळवण्याचा अधिकार आहे अशी उर्मी त्यांच्यामध्ये निर्माण होत होती .याचाच परिपाक म्हणून अनेक तरुण अबाल वृद्ध कार्यकर्ते राष्ट्रीय चळवळीत जोडले गेले. त्यांच्या योगानाबद्दल त्यांनालोकमान्य ही पदवी दिली गेली.  रत्नागिरीमध्ये चिखली या गावात त्यांचा जन्म झाला . त...

प्रासंगिक 3

... तर शेतकऱ्यांसारखे  विद्यार्थी आत्महत्यांचे सत्र सुरू व्हायला वेळ लागणार नाही ! गेल्या अनेक दिवसांपासून पुणे विद्यापीठ ज्या पद्धतीने काम करत आहे त्यावर एक साधी नजर टाकली तरी सगळे वास्तव समोर येईल . नावाजलेले विद्यापीठ म्हणून पुणे विद्यापीठाची ख्याती आहे  . लांबून लांबून विद्यार्थी पुणे विद्यापीठामध्ये प्रवेश मिळावा यासाठी कष्ट करतात.  पुण्यामध्ये आणि पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी अक्षरशः जीव ओततात  पण इथले वास्तव बुध्दीला मुंग्या आणणारे आहे . पुणे विद्यापीठात गोंधळ आहे ,चुकीच्या निर्णयांचे लोंढे आहेत . पैशाचा, वेळेचा अपव्यय आहे आणि अनेकांच्या आयुष्याशी सुरू असलेला खेळ आहे हे तुम्हाला मान्य करावच लागेल . पुणे विद्यापीठ म्हणून दर्जा ढासळला आहे . ढिसाळ कारभार , शिक्षणाचा आणि शिक्षकांचा ढासळलेला दर्जा , कॉपी आणि परीक्षेतील गोंधळामुळे निर्माण झालेली बजबजपुरी हेच ईथले भयानक वास्तव आहे .  पुणे विद्यापीठामध्ये चालणारे काम प्रचंड सावकाश आहे . ऑनलाईन व्यवहारांचा नुसता आव आणला आहे पण कामाची गती खूप कमी आहे . विद्यार्थ्याला...