गोड आवाजाचा धनी प्रसाद बेडेकर
एखाद्या कार्यक्रमात प्रसाद बेडेकर व्यक्ती असली की कार्यक्रम रंगणार ,मजा येणार ,करमून जाणार हे नक्की .देवाने या माणसाला गोड आवाजचं आणि गोड बोलण्याचं घसघशीत अनुदान दिलंय की काय असं वाटायला लागतं .हा माणूस दिसतो गोड, बोलतो गोड आणि आहे देखील गोड. नगरच्या रंगभूमीवर ,प्रत्येक व्यासपीठावर प्रसाद सरांनी यावं आणि जिंकून निघून जावं हे आता नित्याचच झालंय.
माझा आणि या कलाकाराचा फार काही सामना झाला नाही .आमची तोंडओळख आहे .पण त्यांना बघू न त्यांच्यासारखं बनण्याची उर्मी माझ्यात आहे आणि मी यशस्वी देखील होतोय . हा गोड आवाजाचा धनी आपल्यातीलच कोणीतरी आहे असं वाटायला लागतो .कार्यक्रमात जान आणत मेलेले कार्यक्रम जिवंत करण्याची जादू साधलेला एक उमदा कलाकार म्हणजे प्रसाद बेडेकर . श्रोत्याच्या हृदयाला त्याच्या नकळत हात घालण्याची हातोटी साधलेला हा जादूगार आहे .भलेभले लोक तोंडात बोटे घालतील इतका हजरजबाबी , प्रत्येक गोष्टीकडे बारीक लक्ष देणारा ज्ञानपिपासू ,चिकित्सक बालमन जागे ठेवत तारुण्याच्या व्याख्या बदलणारा अवलिया ,प्रखर तल्लख बुद्धिमत्तेच्या बळावर व्यासपीठावर वैचारिक घमासान घडवून आणणारा हा निवेदक आपल्या खासगी आयुष्यातही प्रचंड दिलखुलास आहे .
रंगभूमीवर काम करताना कलाकार म्हणून त्यांची प्रतिभा दिसली आणि कौतुकाची थाप पाठीवर घेत प्रसाद आज नगरचा आवाज बनलेत. .कार्यक्रम कुठलाही असो हा पठ्ठा मात्र गाजवणारच .व्यासपिठाशी काहीतरी गूढ नातं असावं त्यांचं .विलक्षण विनम्र भासणारा, टवटवीत गुलछडीच्या फुलासारखा दिसणारा हा निवेदक माझी प्रेरणा आहे .यामागे त्यांचे कष्ट आहेत .आवाजावर,भाषेवर आणि सदारीकरणावर केलेले त्यांचे काम आहे .साहित्याचा ,संस्कृतीचा त्यांचा व्यासंग आहे . समाजमनाचा अभ्यास आहे .प्रचंड कष्टातून साध्य केलेली ही कला जपताना प्रसाद सर तिला योग्य तो न्याय देतात .
वडील एक प्रसिद्ध व्यक्ती आहेत ,अभ्यासक आणि वक्ते आहेत .त्यांचं बाळकडू मिळालं ,संस्कार मिळत गेले आणि विनम्र भावाने संकटांना आणि यशालादेखील सामोरे जाण्याची शिकवण मिळली .स्वाभिमानाने जगण्याचा अर्थ समजला .हेच आशीर्वाद घेऊन सुरू झालेली घौडदौड आता अनेकांची प्रेरणा आहे .
प्रसाद सर आपल्या एकूणच कर्तुत्वाला मानाचा मुजरा ......
आपला चाहता ,अजिंक्य
वडील एक प्रसिद्ध व्यक्ती आहेत ,अभ्यासक आणि वक्ते आहेत .त्यांचं बाळकडू मिळालं ,संस्कार मिळत गेले आणि विनम्र भावाने संकटांना आणि यशालादेखील सामोरे जाण्याची शिकवण मिळली .स्वाभिमानाने जगण्याचा अर्थ समजला .हेच आशीर्वाद घेऊन सुरू झालेली घौडदौड आता अनेकांची प्रेरणा आहे .
प्रसाद सर आपल्या एकूणच कर्तुत्वाला मानाचा मुजरा ......
आपला चाहता ,अजिंक्य
Comments
Post a Comment