Skip to main content

चंद्रशेखर आझाद एक उमदा राष्ट्रभक्त

एखाद्या व्यायामशाळेत आपण एक फोटो नेहमी बघतो हातात घड्याळ ,भारदस्त छाती, पिळदार दंड असलेला तो क्रांतिकारक म्हणजे चंद्रशेखर आझाद.  क्रांतिकारक म्हणून  प्रसिद्ध असलेल्या चंद्रशेखर आझाद यांचे  आयुष्य एक संघर्षमय जीवनपट आहे त्यांच्या संघर्षाची कहाणी ऐकताना प्रत्येक तरुणाचं रक्त सळसळून उठते.  मुळात त्यांचे  नाव चंद्रशेखर आझाद नसून चंद्रशेखर सीताराम तिवारी असे आहे . त्यांच्या आईचे नाव जगरानी देवी असे होते . 


आझाद यांचा जन्म मध्यप्रदेशातील बावरा गावात 23 जुलै 1606 मध्ये  झाला . हे गाव आदिवासीबहुल भागात मोडते.इथे जंगलात त्यांनी आदिवासी मुलांबरोबर खेळ खेळले. धनुष्यबाण चालवणे ,छोटी मोठी हत्यारे वापराने यात ते तरबेज झाले . याबरोबर त्यांनी आपले शरीर चांगले कमावले .आझाद यांना पुढे काशी येथे संस्कृत पाठशाळेत पाठवण्यात आलं . त्या वेळी काशी मात्र क्रांतिकाऱ्यांचे केंद्र होते . इथे त्यांची ओळख अनेक क्रांतिकाऱ्यांशी झाली आणि देशासाठी काहीतरी करण्याची त्यांची उर्मी जागी झाली .
त्यांच्या आझाद या नावाविषयी अनेक कहाण्या सांगितल्या जातात लहानपणापासूनच अत्यंत वैचारिक असलेल्या चंद्रशेखरला वयाच्या पंधराव्या वर्षी अटक झाली . कारण होते महात्मा गांधींनी पुकारलेल्या असहकार आंदोलनात सहभाग घेतल्याचे .  यातूनच त्यांच्या आयुष्याच्या संघर्षाला सुरुवात झाली. 
1919 साली झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडामुळे इंग्रज सरकारविरोधात जनसामान्यांमध्ये रोष होता . तरुण कार्यकर्त्यांमध्ये क्रांतीची ज्वाला उसळली होती . अशातच गांधीजींनी असहकार आंदोलन सुरू केले होते . ययामध्ये अनेक क्रांतिकाऱ्यांना अटक झाली यामध्ये 15 वर्षे वयाचा चंद्रशेखर देखील होता .
यावेळी अटक झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना त्यांचे नाव विचारले या वेळेस त्यांनी स्वतःचं नाव 'आझाद' सांगितलं ,वडिलांचं नाव 'स्वतंत्र' सांगितलं तर घराचा पत्ता 'जेल' असा सांगितला आणि हे नाव अखंड भारताच्या दैदिप्यमान इतिहासात अमर झाले.
क्षुद्र मने व्यक्तींचा विचार करतात ,छोटी मने घटनांचा विचार करतात तर मोठी मने तत्वांचा विचार करतात. भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या चंद्रशेखर आझाद यांनी आपल्या आयुष्याची तात्विक बांधणी लहानपणापासूनच मजबूत केली होती . यामध्ये त्यांच्या आईचा आणि वडिलांचा वाटा होता त्यांचे वडील संस्कृत पंडित होते त्यामुळेच घरातूनच त्यांना विचारांचं बाळकडू मिळाले. त्यांचे क्रांतीचे विचार आजही लाखो-करोडो तरुण मुलांना पेटवत आहेत. सशस्त्र क्रांतीचा मार्ग त्यांनी का उचलला यामागे एक घटना आहे .
गांधीजींच्या असहकार आंदोलनात चंद्रशेखर आझाद यांनी सक्रिय सहभाग घेतला परंतु त्यांचे सशस्त्र क्रांतीचा विचार लपून राहत नव्हते .चोरीचौरा येथील घटनेमुळे गांधीजींनी असहकार आंदोलन थांबवले . ब्रिटिश सरकारच्या जुलमाला प्रजा कंटाळली असताना गांधीजींनी हा निर्णय का घेतला याचे उत्तर त्यांना मिळाले नाही .  त्यामुळे चंद्रशेखर आझाद क्रोधीत झाले त्यांचं स्वतःशीच वैचारिक द्वंद्व सुरू झालं . यातूनच सशस्त्र क्रांतीकारक म्हणून चंद्रशेखर आझाद यांचा पुनर्जन्म झाला.
आंदोलनात सहभाग असला तरी भारताच्या स्वातंत्र्याचे स्वप्न त्यांनी बघितले होते . स्वातंत्र्याची प्रेरणा त्यांना गप्प बसू देत नव्हती . यातूनच त्यांची ओळख रामप्रसाद बिस्मिल यांच्याशी झाली . राम प्रसाद बिस्मिल हे हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे अध्यक्ष होते . 1923 साली तयार झालेली ही एक क्रांतीकारी संघटना होती . चंद्रशेखर आझाद यांच्यासारख्या क्रांतिकारकांची या संघटनेला गरज होती. या संघटनेत काम करत असताना त्यांनी त्यांच्या नेतृत्वगुणाची चुणूक दाखवली आणि इंग्रजांना अक्षरशहा सळो की पळो करून सोडलं . त्यांच्या या कामगिरीमुळे एक सच्चा निस्सीम राष्ट्रभक्त आणि सशस्त्र क्रांतिकारक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.  इंग्रजी अधिकाऱ्यांना रात्री झोपायची देखील भीती वाटावी अशी या क्रांतिकारकाची ख्याती होती . त्यांनी इंग्रजी अधिकाऱ्यांना इंग्रजांना त्यांनी अशी जरब बसवली अधिकारी काम करेनासे झाले.
1.
हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या नावाने त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची पुनर्बांधणी केली . यामधून क्रांतिकाऱ्यांचे मोठे जाळे निर्माण केले . गांधीजींच्या शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळणार नाही अशी या क्रांतिकारकांची धारणा होती त्यामुळे सशस्त्र क्रांतीचा मार्ग यावेळच्या तरुणांनी उचलला.
२.
प्रजासत्ताक भारत साकारण्यासाठी त्यांनी पैसे एकत्र करायला सुरुवात केली सरकारी तिजोरी लुटणे आणि त्यातून संस्थेच्या कामासाठी पैसा उभा करण्याचं काम क्रांतिकारकांच्या सहकार्याने त्यांनी सुरू केले.
३.
1925 साली काकोरी रेल्वे स्टेशन लुटीच्या प्रकरणात त्यांचा सहभाग होता या लुटलेल्या खजिन्यांमधून मोठे क्रांतिकार्य उभे राहिले.
4.
लाला लजपत राय यांच्या हत्येला कारणीभूत असलेला अधिकारी सॉंडर्स याच्या हत्येच्या कटामध्ये आझाद यांचा सहभाग होता.
5.
काळ आझाद यांनी काही काळ झाशी मधून क्रांतिकार्य केले जाते गावापासून 15 किलोमीटर असलेल्या जंगलात त्यांच्या संस्थेचे केंद्र होते इथे ते नेमबाजीचे प्रशिक्षण आपल्या सदस्यांना देत . नेमबाजीचा सराव करत . त्यांनी एका हनुमानाच्या मंदिराची देखील स्थापना केली होती.
6.
आझाद यांना भगतसिंग यांचे गुरू मानले जाते . 8 एप्रिल 1929 मध्ये आझाद यांच्या नेतृत्वाखाली भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय असेंम्बली मध्ये बॉम्ब फोडला आणि भारत माता की जय च्या घोषणा दिल्या .
आझाद यांच्या सर्व क्रांतिकारी कारवाया या गुपित  असत . ते गावात वावरताना पंडित हरिशंकर ब्रह्मचारी  या नावाने वावरत.  एक संन्यासी साधू म्हणून ते शहरी भागात प्रसिद्ध होते .पोलिसांना देखील त्यांना पकडणे शक्य नव्हतं . शेवटपर्यंत मरेपर्यंत राहील असं चंद्रशेखर आझाद छाती ठोकून सांगायचे आणि ते त्यांनी पाळले देखील.
27 फेब्रुवारी 1931 मध्ये अलाहाबाद येथील आल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांची चकमकीत आझाद यांचा मृत्यू झाला पोलिसांची लढता-लढता आजार यांच्या बंदुकीतील गोळ्या संपल्या त्यांनी जवळजवळ तीन पोलीस शिपायांना ठार केले पिस्तूलमध्ये शेवटची गोळी शिल्लक असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या डोक्यात झाडून घेतली आणि एका महान क्रांतिकाऱ्याचा अंत झाला  . मरेपर्यंत 'आझाद' राहील हे त्यांचे ब्रीद त्यांनी पाळले . देश त्यांच्या योगदानाचे नेहमीच स्मरण ठेवेल .
या क्रांतिकाऱ्यांमुळे देश स्वतंत्र झाला आणि प्रगतीपथावर आला . इंग्रजांच्या दडपशाहीला चंद्रशेखर आझाद यांच्या सारख्या क्रांतिकाऱ्यांनी दिलेले सशस्त्र क्रांतीचे उत्तर म्हणजे भारतीय क्षात्रवृत्तीचे अभिनव प्रदर्शनच होते . चंद्रशेखर आझाद यांना विनम्र अभिवादन  .

Comments

Popular posts from this blog

प्रासंगिक 6 : अखंड हरिनाम सप्ताहावर दीर्घ लेख

एका गावात साधारणपणे अखंड हरिनाम सप्ताह साधारणपणे प्रतिवर्षी एक पासून सात ते आठ एवढे असतात . गावातील संबंधित ट्रस्टची आर्थिक ताकद , प्रथा , परंपरा ,राजकीय गणिते , धर्म , विशिष्ट धर्मातील लोकांची संख्या , जात , हेवेदावे अशा सर्वच गोष्टींचा सप्ताह यशस्वितेवर आणि गर्दीवर परिणाम होतो . हे सर्व घटक सप्ताह नियोजनावर परिणाम करतात . गावाकडे सामान्यपणे सप्ताहाला 'सप्ता' असंच म्हणतात . ज्या देवाचा सप्ता असेल त्याच देवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते  . सप्ताहाची चाहूल लागते ती माईक आणि साउंड सिस्टिमच्या टेस्टिंगसाठी दिलेल्या आवाजावरून . हॅलो चेक....माईक चेक ...हा$$$री.....हा$$$री  ....असे आवाज आले की समजायचं सप्ताह आज आहे . सप्ताहाच्या निमित्ताने टाळकरी , माळकरी , भजनी , साउंड सिस्टिमवाले , भटजी , महाराज , स्वयंपाकी , आचारी , पेटीवाले, संबळवाले , लाईट डेकोरेशन वाले , अगदीच मोठा सप्ता असेल तर कॅमेरावाले , अजूनच मोठा असेल तर पत्रकार , सगळे येतात . एकंदरीत सप्ता म्हणजे सात दिवस नो टेन्शन ! सप्ताहामध्ये विविध विषयांवर विविधांगी चर्चा व्हावी , विवेचन मांडले जावे , आयुष्याची आणि एक...

गावपण भाग 11 : शिंकाळे

शिंकाळे आधुनिकता स्वीकारत आपण पुढे जात आहोत . आपल्यासोबत आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टी बदलत आहेत . अगदी सजीव आणि निर्जीव सुद्धा . या काळाच्या कचाट्यात निर्जीव गोष्टी देखील बदलल्या . अनेक गोष्टी गायब झाल्या , हरवल्या . त्यांच्यासाठी काळ एक प्रलय ठरला . विनाशकारी प्रलय ! कालौघात आलेल्या आधुनिक वस्तूंनी जुन्या वस्तूंना नामोहरम केले . पुराणात जरासंध नावाच्या राक्षसाची कथा येते . फाडून फेकला तरी तो पुन्हा उभा राहायचा .फ्रिजच्या आक्रमणाने शिंकाळं नामशेष झालं , वापरात राहिलं नाही पण शोभेची वस्तू म्हणून टिकून आहे . मुख्य म्हणजे दूध मांजरापासून , उंदरापासून , मुंग्यांपासून सुरक्षित राहावं यासाठी एका चौकोनी पेटीत टांगून ठेवले जाते . त्याला शिंकाळे म्हणतात . ग्रामीण भाषेत 'शिंकं' असंही म्हटलं जातं . अनुस्वार म्हणण्याची अडचण असल्याने 'शिकं' असं म्हटलं जातं . ते साधारण हाताने सहज काढता येईल अशा उंचीवर टांगलेले असते . शिंकाळं बांबूपासून , विविध वेलांपासून देखील बनवले जाते . त्याला व्यवस्थित झाकण देखील असते . पण गावाकडे आम्ही  चक्क महावितरणच्या तारेचं शिंकाळं केलं ! धाग्य...

गावपण भाग 5 : दिवळी आणि कोनाडा

मराठी भाषेतले गावरान आणि सुंदर शब्द हरवत चालल्याची जाणीव झाली आणि यातूनच गावपण हे सदर सुरू केले  . या सदरात आपण बघणार आहोत दिवळी आणि कोनाडा . आजच्या फ्लॅट संस्कृतीत जुन्या घरामध्ये आढळणाऱ्या अनेक गोष्टी दिसत नाहीत . कमी जागेत खूप काही देण्याच्या प्रयत्नात वास्तू विशारदाची देखील धांदल उडते . माझ्या मते आता शहरात स्थायिक झालेल्या पोरांना कोनाडा आणि दिवळी कधीच बघायला मिळणार नाही . असो आपण हे शब्द समजून घेऊ .... दिवळी हा स्त्रीलिंगी शब्द तर कोनाडा हा पुल्लिंगी . दिवळी ही सपराच्या (सप्पर - छोटी झोपडी ) भिंतीत हमखास असायची . दिवा ठेवण्यासाठी असलेली जागा म्हणजे दिवळी अशी व्याख्या आपण करू शकतो . दिवळी ही त्रिकोणी असते . देवळाच्या शिखरासारखी ती वरती  निमुळती होत जाते यावरून देखील त्याला दिवळी म्हणण्याचा प्रघात पडला असावा . सपराच्या दगडी भिंतीत दिवळी सुंदर दिसते . ती भिंतीत जास्तीत जास्त अर्धा फूट असू शकते . गावाकडे अजून दोन चार शब्द आढळतात .साधारण स्वयंपाकघरातून बैठकीच्या खोलीत बघण्यासाठी एक ते दोन इंच लांबी रुंदीचे एक आरपार भोक असायचे .त्याला 'झुरके' असा शब्द आहे . तर दूध आणि इ...