Skip to main content

कवितेच्या गावा जावे -4

मला हल्ली जगण्याचं काहीच वाटत नाही
दाटून येतं पाणी पण पापण्यांमध्ये साठत नाही
पडून जातं  मातीत पण गालावर गोठत नाही
पावसाच्या थेंबांइतकं  सहज पडतं पाणी
ढगांसारखं हलकं वाटतं ,खाली मात्र विचित्र आणीबाणी





फांदी मोकळी होते अलगद गळलेल्या पानांबरोबर
पुन्हा एकदा स्वार होते भिरभिरत्या वाऱ्यावर
नवीन पालवीच्या प्रतीक्षेत चिघळलेल्या जखमांबरोबर


पिकलं सुकलं पिवळं पान जमिनीवर विसावतं
पुन्हा पालवी बनून सळसळण्यासाठी
फांदीला जखम देऊन मातीला मिळण्यासाठी
नियतीचा नियम अजून फांदीला कळण्यासाठी
.वेदनांच्या भीतीने फांदी कधी पालवीला छाटत नाही
पान मात्र रंग बदलत राहतं उगवतीपासून मावळतीपर्यंत

तापला कितीही सूर्य तरी रंगात कधी विटत नाही
खैदान आलं तरी अर्ध्यात कधी फाटत नाही मला हल्ली जगण्याचं काहीच वाटत नाही ....
                             
                                -अजिंक्य

Comments

  1. तापला कितीही सूर्य तरी रंगात कधी विटत नाही

    खैदान आलं तरी अर्ध्यात कधी फाटत नाही मला हल्ली जगण्याचं काहीच वाटत नाही ....खुप मस्त अप्रतिम माऊली��

    ReplyDelete
  2. खुपच छान अजिंक्य

    ReplyDelete

Post a Comment