आमच्या लै गप्पा नसतात . पण टोमणे मारत मारत कोड्यात बोलायची आदत आहे आम्हाला . तसे अजून आम्ही आदत गोर्ह्यासारखे खिदळत असतो . मैफिलीत जास्ती काही मोठे विषय नसतात . मोदींची गाजरं , ठाकऱ्यांच्या डरकाळ्या , पवारांच्या कोपरखळ्या , गांधींचं बालपण , पोरींची थेरं आणि नव्या पिढीतल्या येडपटांच्या गोष्टी असे टॉपिक असतात .
तुश्या गाडी चालवायला असला की बिनधास्त बाता झोडीत निघतो आम्ही . एकदा पेट्रोल पाण्याचा प्रश्न मिटला की मग डिस्टन्स मॅटर करत नाही . बोलता बोलता तुष्याच्या पर्सनॅलिटीवर विषय गेला . मग काय लै उडवली त्याची . त्याच्या दगडी काळ्या रंगापासून ते शुभ्र टपोऱ्या पांढऱ्या दातांपर्यंत आणि पिकलेल्या येड्यावाकड्या केसांपासून ते टाईट शिवलेल्या पॅन्टीपर्यंत गप्पा झाल्या . मुख्य म्हणजे त्याची उडवायला आम्ही दोघंच होतो ! बोलता बोलता विषय तुष्याच्या दातांवर आला . मग तुश्या म्हणाला की "मी ऑफिसमध्ये यायच्या आधी माझे दात येतेत" या वाक्यावर मी बावचळूस्तर हसलो . तसा तुश्या लै खिलाडू वृत्तीचा आहे . पद्धतशीर राहणे , पाऊण तास लेट पण अगदी टायमावर जाणे हे त्याचे विशेष .
काल परवा रतडगावला एका वास्तुशांतीला जाण्याचा दुर्मिळ योग आला . दरम्यान तुश्या असल्यावर हेडफोन , गाणे असल्या गोष्टींची गरज नसते . बोलता बोलता विषय जरा सिरीयस झाला . "मावल्या , लै पोरींच्या नादी लागू नको बरका . चांगला तोंडाव आपटशीन". त्याचं हे नेहमीचं वाक्य आहे . पण आपल्याला आवडलेल्या पोरी त्याला बी आवडत्यात . मला फुल सपोर्ट असतो . मग त्यो त्याला पोरगी पटत नाही या गोष्टीवर नाराज होतो . आणि पुन्हा विषय पर्सनॅलिटीवर येतो . मंग तो म्हणतो . "तू चांगलाच दिसणार , कसाही असला तरी बामनाचा आहे ना तू " यावर मी फक्त हसतो . मग तो म्हणतो "अशी कशी रे बामनाची , सटाकणी !!" बाय द वे सटाकनी हा त्याचा फेवरेट शब्द आहे . अय सटाकण्या असं तो ज्याला त्याला म्हणत असतो .
तसे आम्ही दोघे पण मोदी फॅन आहोत . पण मोदींची गाजरं खाऊन कंटाळा आलेला आहे . दरम्यान लोकं सर्जिकल स्ट्राईकला सोकलेत असं विधान मी केलं . त्यावर लै नेकळा हसला गडी ! त्याची हसण्याची पण एक विशिष्ट पद्धत हे . एखादा पंच मारून झाल्यावर तो तीन सेकंद हक्काचे घेतो . त्यात त्याच्या डोक्यात हास्याची लहर तयार होत असावी . मग तीन सेकंदाच्या प्रदीर्घ गॅपनंतर तो अवकाळी पावसासारखा हसतो . त्याचं पहाडी हसणं लै भारी असतं .
बायकू चा विषय निघाला की तो जरा गंभीर होतो . मला चांगली बायको भेटणार नाही असं त्याचं नेहमीचं रडगाणं असतं . मग तो मला म्हणतो "तुला मस लै भारी भेटन , बघ तू !". त्यो असं म्हणत असताना मी तिच्या म्हणजे माझ्या देवाच्या स्वप्नात रंगायला लागलो की म्हणतो "मावल्या अभ्यास कर बरका !" . मग मी जागा होतो .
रतडगाव ला पोचलो तर ते गोंधळी मंडळी जमली होती . पडवीत एक रग वरती बांधला होता . त्याला घंटी बांधली होती . आम्ही घराची मोजमापे घेतली . या गावात दुमजली घर नाही आणि आतून जिना नाही अशी प्रथा असल्याचे कळले . यावर गप्पा मारताना आमच्या मित्रांनी त्यांच्या त्यांच्या गावच्या अंधश्रध्दायुक्त प्रथांबद्दल इथंबूत माहिती दिली . मुख्य जेवणाच्या कार्यक्रमाला वेळ असल्याने शेजारी ढेकळात आम्ही तळ ठोकला . पुन्हा गप्पा सुरु .
संध्याकाळचे सात वाजले असतील त्यामुळं अंधार झाला होता . बोलताना तुश्याचे दात फक्त चमकायचे काजव्यासारखे ! मग एमपीएससी यूपीएससी असल्या गप्पा झाल्यावर कौटुंबीक गप्पा झाल्या . सुख दुःख झाले . व्हॅलेंटाईन साजरा करावा की नाही यावर चर्चा झाली . आमच्या चर्चा लै मार्मिक असतात . तसे पत्रकारिता सुरू झाल्यापासून आम्ही लै वेगळे पडतो . तो मला पत्रकार मानत नाही .
मंग तिथे रस्त्यावर जेवायला बसलो . बऱ्याच दिवसातून काँक्रीट (भात, भाजी,लापशी) भोजनाचा आस्वाद रस्त्याच्या दुतर्फा बसलेल्या पंगतीत घेतला . मग खाद्य संस्कृतीवर गप्पा झाल्या . या पंगतीत वाढपी लोकांना स्पेसिफिक नावे असतात . म्हणजे भात वाढणारा भातवाला , भाजी वाढणारा भाजीवाला , जिलेबी वाढणारा जीलाबीवाला असे . जे आलंय ते भरघोस वाढून घेणे हा पंगतीचा पहिला नियम असतो . म्हणजे भातावर भाजी घ्यावी असा नियम कोणी पाळला तर त्यो उपाशी राहणार हे नक्की ! वाढी कधी येईल काय सांगता येत नाही . गावातले तरुण लगेच चपला काढून वाढायला सुरू करतात . बाकीचे ढुंगाखाली चपला घेऊन बसतात . चप्पल ढुंगाखाली घेतल्याने चोरी जाण्याची शक्यता नसते आणि जेवण जास्त जातं हा आमचा सर्वांचा अनुभव . जर जेवण करत असताना वावटळ आली तर काय करावे याचे उपजत ज्ञान आम्हा मंडळींना आहे . यामुळे आमचा ऊर अभिमानाने भरून येतो .
इकडे कढी भात आणि लापशी देण्याची पद्धत आहे हे नव्याने समजले . दणकून जेवण करत असताना एस टी आली . रतडगाव अहमदनगर ही लाल परी ऐटीत उभी राहिली . एवढी पंगत उठेपर्यंत तिला जाता येणार नव्हतेच . ड्रायवर कंडक्टर उतरले . हात धुवून मशीन मांडीवर आणि चप्पल ढुंगाखाली घेऊन निवांत जेवायला बसलो . एकाने गांधी टोपी रीतसर मांडीवर काढून ठेवली . हे आमच्या संस्काराचे भाग !
म्हशीच्या गोठ्यातून येणारा शेणाचा गावरान वास , रानातला मोकळा वारा , धोतर आणि नऊवारी अदबीने ल्यायलेली माणसं हे दृश्य नेहमीच खूप आश्वासक वाटते . जेवण झाल्यावर किक मारून तुषार बरोबर रूमवर आलो . येताना लग्न बिग्न झाल्यावर कंपल्सरी गांधी टोपी वापरायला चालू करणार आहे असं आम्ही ठरवलं . दरम्यान तुश्याचे ग्लासभर कढी प्यायचे राहून गेले कारण पंगतीचा पहिला नियम तो विसरला !
#किस्से दोस्ती के
#अजिंक्यदंडवते

लय लवकर संपवलं लेका ! ते वाढून बिडून न्यायचे किस्से राहिलेच बरं का..
ReplyDeleteकढी प्यायची पण राहून गेली ...
Mauli 👍✌️✌️😘😘😘
ReplyDeleteKhupach chhan lihly Ajinkya... Pn khupach lavkr sampavala yar tu lekh tushya chya ajun khupach kahi gosti rahilya sangayachya...!
ReplyDeleteभारीच.💐... अजिंक्य च्या नजरेतील तुषार, एक हेवा वाटावा अशी मैत्री ......आणि बरचं काही... पद्धतशीर टोमणा आणि गंभीर विनोद करण्यात पटाईत असलेला तुषार तसा आहेच म्हणा ग्रेट....त्याच्यावर लिहायच म्हणजे एक पुस्तक तर नक्कीच होईल..
ReplyDelete😁😁😁😁
ReplyDeleteसुंदर मैत्रीच वास्तव दर्शन लिखाण शैली मधून
ReplyDeleteलापशी सारखा तुषार सरांचा personality मधील गोडवा आणि त्या गोडव्याला साथ म्हणून अजिंक्य चे भाता वरच्या आंबट-तिखट सांबर सारखे शब्द याचं मिश्रण पाहता, या किस्यात .... " मैत्रितल्या गप्पा म्हणजे काय असतं ? " हे वाचायला मिळालं.
ReplyDelete