ताल आणि बांधारी
ताल शब्द नाही पण या शब्दाचा अर्थ हरवतोय . मराठी भाषेत हा शब्द दोन तीन अर्थांनी वापरला जातो . एक ताल संगीतातील आहे . ताल या शब्दाचा दुसरा अर्थ रीत किंवा पद्धत असाही होतो . बेताल म्हणजे ताल नसलेला किंवा अनियंत्रित असा . असो आपण गावपन या सदरात गावामध्ये वापरल्या जाणऱ्या ताल या शब्दविषयी बोलू .

याआधी आपण खिळपाट , आरण ,कालवड असे मराठी भाषेतून गायब होत चाललेले शब्द समजून घेतले . यातल्या खिळपाटाशी साम्य सांगणारा शब्द आहे ताल . खिळपाट हा शब्द नपुसकलिंगी तर ताल हा शब्द स्त्रीलिंगी आहे . दगडाची ओबडधोबड रचलेली जाड भिंत म्हणजे ताल . ताल ही खिळपाटाच्या तुलनेत छोटी पण रुंद असते . पाण्यामुळे जमिनीची झीज होऊ नये म्हणून घातलेला दगडी बांध म्हणजे ताल . खिळपाटाप्रमाणे ताल देखील माती ,सिमेंट अशा गोष्टींशीवाय बांधलेली असते त्यामुळे इथे सुद्धा कसब लागते .
पूर्वी डोंगरउतारावर शेती केली जायची तेव्हा माती धरून रहावी आणि पाणी अडवून राहावे यासाठी ताल घातली जायची . यामुळे मृदा आणि जलसंधारण व्हायचे . जमिनीला उतार जास्त असेल तर तो कमी करण्यासाठी ताल घातली जाते . तालीची रुंदी साधारण 3 फुटाच्या आसपास असते . खाली ती जास्त रुंद असते आणि वरती निमुळती होत जाते . त्यामुळे माती धरून राहते आणि पाण्याचा निचरा देखील होतो . माती ओली झाल्यानंतर जास्त पाणी साठवून ठेऊ शकत नाही .अशा वेळी बांध वाहून जातात पण जर ताल असेल तर पाणी आपोआप निघून जाते . आजकाल या ताली बघायला मिळत नाही . ताली म्हणजे शेतजमिनीच्या भुवयाच असतात जणू ! आणि जर भुवयाच नसतील तर चेहरा कसा दिसेल जरा कल्पना करा .
गावाकडे बांधारी अशी एक गोष्ट असते . बांधारी हा शब्द बंधारा या शब्दावरून आला आहे . बंधाऱ्याच्या तुलनेत छोटा असलेला बांध म्हणजे बांधारी . शेताच्या बांधाला बांधारी म्हणतात . पूर्वी मोटेचे ( विहिरीतून बैलांच्या साहाय्याने पाणी काढण्याचे जुने तंत्र ) पाणी जाण्यासाठी बांधारीवरून पाट ( पाणी इच्छित स्थळी नेण्यासाठी केलेला मातीचा छोटा कॅनल ) केलेला असायचा . त्यामुळे बांधारी दगडाने भक्कम केलेली असायची . बांधून घेतलेली असायची . कदाचित यामुळेच बांधून घेतलेला बांध म्हणजे बांधारी असा शब्दप्रयोग आला असावा .

गावाकडे या बांधारीवर हमखास पेरूची किंवा जांभळीची झाडे असतात . सावलीसाठी कडुनिंबाचे झाड देखील असते . पिंपळाचे किंवा वादाचे झाड त्रासदायक ठरते त्यामुळे शक्यतो त्याची वाढ शेतकरी होऊ देत नाहीत . चुकून पिंपळाचे झाड आले तर मग त्या झाडाखाली म्हसोबा किंवा मुंजोबाची प्रतिष्ठापना होते . बांधारी प्रत्येक उन्हाळ्यात साफ करावी लागते नाहीतर पिकांमध्ये उंदराचे प्रमाण वाढते . बांधारीवर बोराट्यांचे आक्रमण होते . मग रात्रीच्या वेळी शेतात जायची भीती वाटायला लागते .
पहाटेपासून म्हणजे अगदी 3 वाजल्यापासून नांगर हाकल्याच्या आठवणी जुने जाणते सांगतात . तेव्हा सकाळी कारभारीन न्याहारी घेऊन यायची . बांधारीवर सावलीला बसून ती न्याहारी सोडण्यातला आनंद एक आजोबा माझ्यासमोर व्यक्त करत होते . त्यांची कारभारीन त्यांना आणि या जगाला सोडून कधीच गेली होती . गुडग्यावर कांदा फोडून न्याहारीवर ताव मारताना कारभारणीच्या डोळ्यातले समाधान त्यांनी बघितले होते . बांधारीवर वाढलेला पवना (एक गवत ) खाताना बैलांच्या घंटीचा निनाद त्यांनी ऐकला होता . त्या सगळ्या गोष्टी आठवताना आजोबांनी ती बांधारी डोळ्यासमोर उभी केली होती आणि त्यांचेही डोळे पाणावले होते .
एकंदरीत ताल पूर्णपणे दगडी असते तर बांधारी माती आणि दगडात बांधलेली असते . शेताचा बांध किंवा सीमा देखील त्यामुळे स्पष्ट होत . यातूनच पुढे सीमावाद सुरू झाला . शेतीचे जसे तुकडे झाले तसे शेताच्या बांधावरून भांडणे उभी राहिली . न्यायालयात खटले भरले गेले .यातून पुढे बांध कोरणे हा वाक्प्रचार देखील पुढे रूढ झाला ! बांधाला बांध असणे म्हणजे रोजचे संबंध असणे हे देखील त्याचेच अपत्य . बांधारीवर हरळी वाढल्याने मातीची झीज होत नाही हा एक फायदा .
आजकाल जमिनीच्या कमतरतेमुळे बांधाऱ्या आणि ताली राहिल्या नाहीत . त्या छोट्या होत गेल्या . त्यावर लिंबाचे आंब्याचे झाड असत नाही . आजच्या पिढीला बांधारीवर बसून खाल्लेले पेरू ,आंबे ,सीताफळ आठवत नाही . बांधारीवर बसून विविधभारती रेडिओ ऐकलेला आठवत नाही . ती प्रेमळ रांगडी संस्कृती खरच हरवते आहे लुप्त होत चाललेल्या तालींबरोबर आणि बांधाऱ्यांबरोबर .....
--ajinkya
Nice bro 👌👌
ReplyDeleteमस्त आहे लेख....👌
ReplyDeletethanku
DeleteNice
ReplyDeleteNice bro.����
ReplyDelete
ReplyDelete👌👌👌👌👌
मस्त भाऊ
ReplyDeleteछान माहिती अजिंक्य ...शहरातल्या लोकांनी तर हे सौंदर्य पाहिलेलं नाहीच पण ग्रामीण भागात सुद्धा हे लुप्त होत चाललंय ... त्यामुळे सर्वानीच जरूर वाचवा असा लेख....
ReplyDeletethanku lot
DeleteNice
ReplyDelete