Skip to main content

प्रासंगिक 4 :हेडफोन



"काय सारखं कानात खुंट्या ठोकून बसलाय ....!!!."हे वाक्य आपल्या सर्वांच्या कानी आलेच असेल . " कानात खुंट्या ठोकून बसने हे तुला अजिबात शोभत नाही , टुकारपणाची लक्षणे आहेत ही "असं कितीही चिडवलं तरी आम्ही मात्र हेडफोन वापरतो . प्रेमात पडलेल्या प्रेमवीरांचे सर्वात मोठे अस्त्र म्हणजे मोबाईल आणि छोटे हत्यार म्हणजे हेडफोन ! गुपचिप खूप वेळ गप्पा मारताना हेडफोन लागतोच ...त्यातून पाठवलेले किसेस ,  गुलाबी गप्पा , सिक्रेट्स सगळं काही हेडफोनच्या भावविश्वाचा एक भागच . अगदी ब्रम्हानंदी टाळी लागते हेडफोन घातले की !

कानाला लावून बोलायच्या डबड्या फोनपासून कानात घालायच्या ब्लुटूथपर्यंत तंत्रज्ञान उत्क्रांत झाले . एक थेंब पाणी गेले तरी बिघडणाऱ्या यंत्रापासून पाण्यात वापरायच्या यंत्रापर्यंत आपण मजल मारली . आपल्या सुखासाठी मानवाची ही अथक धडपड फार रोमहर्षक आहे . विमानात न मावणाऱ्या कॉम्पुटर पासून ते थेट आपल्या घड्याळात आलेल्या कॉम्प्युटरचा हा प्रवास अलीकडच्या काळात प्रचंड झपाट्याने झाला . या सगळ्यात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये हेडफोनशी प्रत्येकाचे अगदी जिव्हाळ्याचे नाते आहे .

अगदी ब्रेकअप झाल्यावर 'तुझं बिन सुरज मे आग नही रे , तुझं बिन कोयल मे राग नहीं रे ' किंवा ' तू प्यार हैं किसीं और का ...' आणि प्रेम झाल्यावर डीडीएलजे , टू स्टेटस , रांझना , मैं हूं ना अशी चुपके चुपके चोरी चोरी ऐकलेली गाणी प्रत्येकाला आठवत असतात .  या सर्व प्रसंगांमध्ये आपल्या सोबत नेहमी असणारा मित्र म्हणजे आपला हेडफोन . घरच्यांसाठी बोळे, ढेप्या ,खुंट्या काहीही असो पण आपल्यासाठी हा जीव की प्राण असतो ! दोस्तीमध्ये मी एक वेळ जीव देईल पण हेडफोन देणार नाही असे लोक आपणही पाहिले असतील  !

तसं बघितलं तर हेडफोन ही विकत घेण्याची गोष्टच नाही हे नवे तत्वज्ञान जन्म घेते आहे . आजवर एकही हेडफोन विकत घेतला नाही आणि घेणारही नाही अशी अनेकांची प्रतिज्ञाच ! असो , फुल बेसवर डीजे  गाणी ऐकायला प्रत्येकालाच आवडत असते . यावर अगदी नागाच्या पिल्यापासून गडूळाच्या पाण्यापर्यंत आणि धनगरवाड्यात घुसलेल्या देवापासून आगडबम नगाऱ्यापर्यंत सगळी गाणी अगदी जवळची . थ्री इडिटसमधल्या 'बहती हवा सा था वो...' पासून 'मेरे रष्के कमर' पर्यंत सगळी गाणी अगदी तोंडपाठ ! सुखात दुःखात आपल्याला साथ देणारा हेडफोन जवळ नसेल तर साला जिंदगित काय मजा?

मित्राचे हेडफोन ढापुन आणल्यानंतर गाण्याची चव अगदी जुन्या बिअर सारखी लागते . त्यात एक वेगळीच नशा असते . मैत्रीचा गोडवा आणि त्यावर फुकट मिळाल्याच्या आनंदाची झनकेबाज फोडणी म्हणजे काय विचारलं ? भाऊ एक वेळ खायला नसुदे पण मराठी माणसाला कानात हेडफोन आणि भीमराव पांचाळे , सुरेश भट , सुरेश वाडकर हवेच !!!डोळे झाकून ऐकलेला अनुप जलोटा , गुलाम अली , बेगम अख्तर , पंडित जितेंद्र अभिषेकी , भीमसेन जोशी ,किशोरी अमोनकर सारे काही अद्भुत , अवर्णनीय. संगीत नावाची ही बिअर हेडफोन नावाच्या ग्लासने पिली तरच चढते !!!! त्यात शंकर जयकिशनचं संगीत असेल तर झऱ्याशेजारी बसल्याचाच भास होईल !

डोळे मिटून ऐकलेला अदनान सामी , कुमार सानू , मुहम्मद रफी , किशोर कुमार , लता मंगेशकर , श्रेया घोषाल , नेहा कक्कर आणि  बेहोष होऊन ऐकलेला सोनू निगम ही सगळी अद्भुत रसायनेच ! मिका सिंग , हनी सिंग पासून जस्टीन बिबर सगळे आपले जवळचेच... हेडफोनच्या नात्यातले ...या रसायनांच्या साथीने आपण आपल्यामध्ये कुठेतरी जिवंत असतो . लॉंग ड्राईव्ह असो किंवा बसचा प्रवास , विमानप्रवास असो किंवा भटकंती ही गाणी आणि कानातले कॉड जान आणतात .प्रसंगांमध्ये रंग भरतात . हेडफोनच्या वायर म्हणजे मोह मोह के धागेच नाही का ?


बीभत्स गाणी आणि कानाला त्रास होईल एवढा आवाज टाळला तर हेडफोनचे व्यसन तुम्हाला खूप काही देऊन जाईल . मोबाईल मधून निघणाऱ्या हानिकारक किरणांना देखील आपण हेडफोन वापरून टाळू शकतो .

मोबाईल शरीरापासून एक फूट दूर ठेवावा अशी सूचना मोबाईलच्या बरोबर आलेल्या पुस्तकात असते त्यामुळे हेडफोन वापरण्याची सवय चांगली आहे .

उच्च प्रतीच्या ब्रँडेड हेडफोनमुळे आपले कुठलेही नुकसान होत नाही .कधी कधी मोठ्या ऑफिसेस मध्ये फुल एसी सुरू असेल आणि तुम्हाला थंडी वाजत असेल तर चुपचाप आपले हेडफोन काढा आणि कानात घाला . थंडी कमी होईल !

कोणाशी बोलायचे नसेल तर हेडफोन घाला आणि बिनदास्त मोठ्या आवाजात गाणी लावा , त्या व्यक्तीपासून आपली सुटका होईल .

हेडफोन घातल्यावर आपल्याला काही आवाज येत नाही अशी अभिनय करा . शेजारचा बिनदास्त काही सिक्रेट गोष्टी बोलत असेल तर आपण त्या ऐकू शकतो .

रोज कमी आवाजात आपण आवडती गाणी ऐकली तर मानसिक समाधान मिळते आणि एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते . या म्युझिक थेरपीपासून आपण अनेक मानसिक विकारांना दूर सारू शकतो .

प्रवासामध्ये आपण काही महत्वाची भाषणे , बातम्या , व्हिडीओ कुणालाही डिस्टर्ब न करता ऐकू शकतो . त्यामुळे आपल्याला अपडेट राहण्याची सवय लागते .

 हेडफोन आणि कानाच्या पडद्यामधून आपण पित असतो सलाईन ....आतून थंड करणारे ,समृद्ध करणारे ,  गुलाबी थंडीत गारठवणारे , प्रेरणा देणारे , आम्हाला आतून सुंदर बनवत जाणारे . हे सलाईन आहे समाधी अवस्थेचे सुख देणारे ,आयुष्य समृद्ध करणारे , जिवंतपणे स्वर्ग दाखवणारे !!!

-अजिंक्य

Photo by avinash jadhav

Likeme.comment me. Share me.








Comments

  1. ऊत्तम...मोह मोह के धागे वाला कन्सेप्ट तर भन्नाटच...

    ReplyDelete
  2. Kya demag lagaya hai man aye bhai salam hai aapko mera

    ReplyDelete
  3. 😁😁😁😁😚😚😙😍😘

    ReplyDelete
  4. Apratim likhan bhau...Tuzya creativity la salam. ..Salam music therapy la...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रासंगिक 6 : अखंड हरिनाम सप्ताहावर दीर्घ लेख

एका गावात साधारणपणे अखंड हरिनाम सप्ताह साधारणपणे प्रतिवर्षी एक पासून सात ते आठ एवढे असतात . गावातील संबंधित ट्रस्टची आर्थिक ताकद , प्रथा , परंपरा ,राजकीय गणिते , धर्म , विशिष्ट धर्मातील लोकांची संख्या , जात , हेवेदावे अशा सर्वच गोष्टींचा सप्ताह यशस्वितेवर आणि गर्दीवर परिणाम होतो . हे सर्व घटक सप्ताह नियोजनावर परिणाम करतात . गावाकडे सामान्यपणे सप्ताहाला 'सप्ता' असंच म्हणतात . ज्या देवाचा सप्ता असेल त्याच देवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते  . सप्ताहाची चाहूल लागते ती माईक आणि साउंड सिस्टिमच्या टेस्टिंगसाठी दिलेल्या आवाजावरून . हॅलो चेक....माईक चेक ...हा$$$री.....हा$$$री  ....असे आवाज आले की समजायचं सप्ताह आज आहे . सप्ताहाच्या निमित्ताने टाळकरी , माळकरी , भजनी , साउंड सिस्टिमवाले , भटजी , महाराज , स्वयंपाकी , आचारी , पेटीवाले, संबळवाले , लाईट डेकोरेशन वाले , अगदीच मोठा सप्ता असेल तर कॅमेरावाले , अजूनच मोठा असेल तर पत्रकार , सगळे येतात . एकंदरीत सप्ता म्हणजे सात दिवस नो टेन्शन ! सप्ताहामध्ये विविध विषयांवर विविधांगी चर्चा व्हावी , विवेचन मांडले जावे , आयुष्याची आणि एक...

गावपण भाग 11 : शिंकाळे

शिंकाळे आधुनिकता स्वीकारत आपण पुढे जात आहोत . आपल्यासोबत आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टी बदलत आहेत . अगदी सजीव आणि निर्जीव सुद्धा . या काळाच्या कचाट्यात निर्जीव गोष्टी देखील बदलल्या . अनेक गोष्टी गायब झाल्या , हरवल्या . त्यांच्यासाठी काळ एक प्रलय ठरला . विनाशकारी प्रलय ! कालौघात आलेल्या आधुनिक वस्तूंनी जुन्या वस्तूंना नामोहरम केले . पुराणात जरासंध नावाच्या राक्षसाची कथा येते . फाडून फेकला तरी तो पुन्हा उभा राहायचा .फ्रिजच्या आक्रमणाने शिंकाळं नामशेष झालं , वापरात राहिलं नाही पण शोभेची वस्तू म्हणून टिकून आहे . मुख्य म्हणजे दूध मांजरापासून , उंदरापासून , मुंग्यांपासून सुरक्षित राहावं यासाठी एका चौकोनी पेटीत टांगून ठेवले जाते . त्याला शिंकाळे म्हणतात . ग्रामीण भाषेत 'शिंकं' असंही म्हटलं जातं . अनुस्वार म्हणण्याची अडचण असल्याने 'शिकं' असं म्हटलं जातं . ते साधारण हाताने सहज काढता येईल अशा उंचीवर टांगलेले असते . शिंकाळं बांबूपासून , विविध वेलांपासून देखील बनवले जाते . त्याला व्यवस्थित झाकण देखील असते . पण गावाकडे आम्ही  चक्क महावितरणच्या तारेचं शिंकाळं केलं ! धाग्य...

गावपण भाग 5 : दिवळी आणि कोनाडा

मराठी भाषेतले गावरान आणि सुंदर शब्द हरवत चालल्याची जाणीव झाली आणि यातूनच गावपण हे सदर सुरू केले  . या सदरात आपण बघणार आहोत दिवळी आणि कोनाडा . आजच्या फ्लॅट संस्कृतीत जुन्या घरामध्ये आढळणाऱ्या अनेक गोष्टी दिसत नाहीत . कमी जागेत खूप काही देण्याच्या प्रयत्नात वास्तू विशारदाची देखील धांदल उडते . माझ्या मते आता शहरात स्थायिक झालेल्या पोरांना कोनाडा आणि दिवळी कधीच बघायला मिळणार नाही . असो आपण हे शब्द समजून घेऊ .... दिवळी हा स्त्रीलिंगी शब्द तर कोनाडा हा पुल्लिंगी . दिवळी ही सपराच्या (सप्पर - छोटी झोपडी ) भिंतीत हमखास असायची . दिवा ठेवण्यासाठी असलेली जागा म्हणजे दिवळी अशी व्याख्या आपण करू शकतो . दिवळी ही त्रिकोणी असते . देवळाच्या शिखरासारखी ती वरती  निमुळती होत जाते यावरून देखील त्याला दिवळी म्हणण्याचा प्रघात पडला असावा . सपराच्या दगडी भिंतीत दिवळी सुंदर दिसते . ती भिंतीत जास्तीत जास्त अर्धा फूट असू शकते . गावाकडे अजून दोन चार शब्द आढळतात .साधारण स्वयंपाकघरातून बैठकीच्या खोलीत बघण्यासाठी एक ते दोन इंच लांबी रुंदीचे एक आरपार भोक असायचे .त्याला 'झुरके' असा शब्द आहे . तर दूध आणि इ...