.......याला कविता म्हणता येईल .
पावसाच्या सरी आणि शब्दांच्या लहरी जेव्हा मिसळतात तेव्हा काही तुषार उडतात . त्यांना प्रचंड अर्थ, सामर्थ्य असतं . हे तुषार एखाद्या हिरव्यागार तृणपर्णावर मोती बनून साठतात . त्याला कविता म्हणता येईल .....
रवीने घुसळून घुसळून बनलेला लोण्याचा गोळा जेव्हा चुलीवरच्या ताज्या भाकरीवर वितळतो तेव्हा त्या वितळत जाणाऱ्या लोण्याच्या शांततेला कविता म्हणता येईल ....
नितळ डोळ्यांमधून पडणाऱ्या पाण्याच्या थेंबाला अदृश्य करणारी माती जेव्हा त्या थेंबाला गवसणी घालून जमा होते तेव्हा त्या मातीच्या एकवटण्याला कविता म्हणता येईल....
जन्म घेतलेल्या अंकुराला खुडून कातील पुढे जातो पण अस्तित्व मागे ठेवणाऱ्या धसकटाला कविता म्हणता येईल....
फडफडणाऱ्या कापडाच्या रंगासाठी तडफडणार्या जीवांना बघून आंधळेपणाचे सोंग घेतलेल्या डोळ्यांना कविता म्हणता येईल ....
बोरीच्या आकडेदार काट्यांनी पकडलेल्या कपड्याला सोडवताना न दिसलेल्या बोराटीच्या स्पर्श तृष्णेला कविता म्हणता येईल .....
वाऱ्यामध्ये फडफडणारे पान आणि त्याच्या शब्द पकडून ठेवण्यासाठीच्या धडपडीला कविता म्हणता येईल....
आईच्या भेगाळलेल्या हाताला वास्तवाच्या विळ्याने कापल्यावर बांधलेल्या चिंधीच्या शेपूऱ्यांच्या हालचालींना कविता म्हणता येईल ....
-अजिंक्य

छान
ReplyDeleteआईच्या भेगाळलेल्या हाताला वास्तवाच्या विळ्याने कापल्यावर बांधलेल्या चिंधीच्या शेपूऱ्यांच्या हालचालींना कविता म्हणता येईल........
ReplyDeleteअप्रतिम शब्द रचना !!
Dhanyavad
Deleteछान👌
ReplyDeleteNice
ReplyDeleteउत्कृष्ट
ReplyDeleteया कवितेला कविता म्हणता येईल.
ReplyDeleteVery nice bhava
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice bhau👌👌
ReplyDelete