Skip to main content

प्रासंगिक 3

विखे पाटील कॅम्पस मध्ये खऱ्या अर्थाने रुजली कॉलेज संस्कृती!

कोण ? कुठला ?कसा? यापेक्षा विखे पाटील कॅम्पसमध्ये म्हणजे पाटलांचा ! अशी एक वेगळी ओळख घेऊन या कॅम्पसमध्ये एका नव्या कॉलेज संस्कृतीने जन्म घेतला . जातपात, धर्म आणि उच्च निचतेच्या बेड्या फेकून देत इथल्या तरुणांनी एकत्र येत नवे आदर्श घालून दिले . फार्मसी ,इंजिनिअरिंग , मेडिकल तसेच अग्रीकल्चर असे अनेक अभ्यासक्रम इथे शिकतानाच मुले जीवन जगण्याची कला इथे शिकतात.

 या गणेशोत्सवात अत्यंत भक्तिभावाने मुलांनी गणरायाची प्रतिष्ठापना इथे केली आहे . मनात आलं तर लाथ मारील तिथे पाणी काढील अशा पिळदार मनगटांची एक फौज इथे सामाजिक कार्यासाठी सदैव तत्पर असते . लांबून आलेल्या मुलांचे प्रॉब्लेम सिनिअर मुले समजून घेतात . सुख दुःखात एकमेकांना घरच्यासारखा आधार देतात . एखाद्याच्या शिक्षणाला मदत करणे असो किंवा एखाद्याची शालेय फी देने असो इथला प्रत्येक जण मोकळ्या हाताने मदत करतो आणि यातूनच एक जिव्हाळ्याचे नाते या परिसरासोबत तयार होते .

इथे सुमारे 20 गणेश मंडळे असतील . एकमेकांच्या संमतीने रोज एका वेगळ्या ठिकाणी गोडधोड महाप्रसाद असतो . हॉस्टेलची मुले स्वतः वेळ देऊन व्यवस्थित नियोजन करतात . अगदी प्रेमाने एकमेकांना जेऊ घालतात . कुठलीही चिडचिड नाही ,त्रागा नाही . भांडणे फार क्वचित होतात  . कार्यक्रम मात्र भल्याभल्यांना नाही जमणार एवढे सुंदर होतात ! इथे यारी दोस्ती एवढी कट्टर आहे की घरची आठवण सुद्धा येत नाही !

वाढदिवस असतील तर मिळालेला गोड मार तर प्रत्येकाच्या आठवणींचा एक अविभाज्य भाग असेल . खचलेल्यांना लढायला आणि हरलेल्यांना जिंकायला शिकवणारी नवी विचारपद्धती इथे नांदते त्यामुळे इथे शिकणाऱ्या प्रत्येकाला या परिसराचा प्रचंड मोठा अभिमान असतो . विळद घाटासारख्या दुर्लक्षित भागाला इथे शिकणाऱ्या तरुणांनी त्यांच्या या कॉलेज संस्कृतीमुळे एक नवी ओळख दिली आहे .या संस्कृतीचा हिस्सा असलेल्या प्रत्येकाला मला लाख धन्यवाद द्यावे वाटतात .

दरवर्षी नवे विद्यार्थी येतात . थोडेसे घाबरलेले असतात पण लवकरच मोठ्या भावासारखे सिनिअर्स त्यांना समजून घेतात . शिकवतात . त्यांच्या दोस्तीमधून ही कॉलेज संस्कृती अधिकच वृद्धिंगत होत असते . इथे ढोल ताशांचा गजर आहे . टाळ चिपळ्यांचा जयजयकार आहे . दोस्तीच्या गोष्टी आहेत . प्रेमाचे मॅटर आहेत . विजयाचा जल्लोष आणि पराभवाचे अश्रू सुद्धा आहेत . तरुणाईचा धिंगाणा आणि वडीलधाऱ्यांचा सन्मान आहे . शिक्षकांचा आदर आहे आणि अभ्यासाचा व्यासंग आहे . संस्कृतीशी जवळीक असूनही आधुनिकतेचा साज आहे . इथे छत्रपती शिवरायांचे शौर्य आणि विवेकानंदांचे तेज आहे . तुकारामाची गाथा आणि आंबेडकरांचे संविधान देखील आहे ! इथे राष्ट्र निर्माणाची प्रेरणा आहे कारण इथे कॉलेज संस्कृती घट्ट रुजली आहे !!!

-अजिंक्य

Like me . Comment me. Follow me .


Comments

  1. We proud of that culture...I'm also part of this clg...
    Very nice Ajinkya
    👌👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रासंगिक 6 : अखंड हरिनाम सप्ताहावर दीर्घ लेख

एका गावात साधारणपणे अखंड हरिनाम सप्ताह साधारणपणे प्रतिवर्षी एक पासून सात ते आठ एवढे असतात . गावातील संबंधित ट्रस्टची आर्थिक ताकद , प्रथा , परंपरा ,राजकीय गणिते , धर्म , विशिष्ट धर्मातील लोकांची संख्या , जात , हेवेदावे अशा सर्वच गोष्टींचा सप्ताह यशस्वितेवर आणि गर्दीवर परिणाम होतो . हे सर्व घटक सप्ताह नियोजनावर परिणाम करतात . गावाकडे सामान्यपणे सप्ताहाला 'सप्ता' असंच म्हणतात . ज्या देवाचा सप्ता असेल त्याच देवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते  . सप्ताहाची चाहूल लागते ती माईक आणि साउंड सिस्टिमच्या टेस्टिंगसाठी दिलेल्या आवाजावरून . हॅलो चेक....माईक चेक ...हा$$$री.....हा$$$री  ....असे आवाज आले की समजायचं सप्ताह आज आहे . सप्ताहाच्या निमित्ताने टाळकरी , माळकरी , भजनी , साउंड सिस्टिमवाले , भटजी , महाराज , स्वयंपाकी , आचारी , पेटीवाले, संबळवाले , लाईट डेकोरेशन वाले , अगदीच मोठा सप्ता असेल तर कॅमेरावाले , अजूनच मोठा असेल तर पत्रकार , सगळे येतात . एकंदरीत सप्ता म्हणजे सात दिवस नो टेन्शन ! सप्ताहामध्ये विविध विषयांवर विविधांगी चर्चा व्हावी , विवेचन मांडले जावे , आयुष्याची आणि एक...

गावपण भाग 11 : शिंकाळे

शिंकाळे आधुनिकता स्वीकारत आपण पुढे जात आहोत . आपल्यासोबत आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टी बदलत आहेत . अगदी सजीव आणि निर्जीव सुद्धा . या काळाच्या कचाट्यात निर्जीव गोष्टी देखील बदलल्या . अनेक गोष्टी गायब झाल्या , हरवल्या . त्यांच्यासाठी काळ एक प्रलय ठरला . विनाशकारी प्रलय ! कालौघात आलेल्या आधुनिक वस्तूंनी जुन्या वस्तूंना नामोहरम केले . पुराणात जरासंध नावाच्या राक्षसाची कथा येते . फाडून फेकला तरी तो पुन्हा उभा राहायचा .फ्रिजच्या आक्रमणाने शिंकाळं नामशेष झालं , वापरात राहिलं नाही पण शोभेची वस्तू म्हणून टिकून आहे . मुख्य म्हणजे दूध मांजरापासून , उंदरापासून , मुंग्यांपासून सुरक्षित राहावं यासाठी एका चौकोनी पेटीत टांगून ठेवले जाते . त्याला शिंकाळे म्हणतात . ग्रामीण भाषेत 'शिंकं' असंही म्हटलं जातं . अनुस्वार म्हणण्याची अडचण असल्याने 'शिकं' असं म्हटलं जातं . ते साधारण हाताने सहज काढता येईल अशा उंचीवर टांगलेले असते . शिंकाळं बांबूपासून , विविध वेलांपासून देखील बनवले जाते . त्याला व्यवस्थित झाकण देखील असते . पण गावाकडे आम्ही  चक्क महावितरणच्या तारेचं शिंकाळं केलं ! धाग्य...

गावपण भाग 5 : दिवळी आणि कोनाडा

मराठी भाषेतले गावरान आणि सुंदर शब्द हरवत चालल्याची जाणीव झाली आणि यातूनच गावपण हे सदर सुरू केले  . या सदरात आपण बघणार आहोत दिवळी आणि कोनाडा . आजच्या फ्लॅट संस्कृतीत जुन्या घरामध्ये आढळणाऱ्या अनेक गोष्टी दिसत नाहीत . कमी जागेत खूप काही देण्याच्या प्रयत्नात वास्तू विशारदाची देखील धांदल उडते . माझ्या मते आता शहरात स्थायिक झालेल्या पोरांना कोनाडा आणि दिवळी कधीच बघायला मिळणार नाही . असो आपण हे शब्द समजून घेऊ .... दिवळी हा स्त्रीलिंगी शब्द तर कोनाडा हा पुल्लिंगी . दिवळी ही सपराच्या (सप्पर - छोटी झोपडी ) भिंतीत हमखास असायची . दिवा ठेवण्यासाठी असलेली जागा म्हणजे दिवळी अशी व्याख्या आपण करू शकतो . दिवळी ही त्रिकोणी असते . देवळाच्या शिखरासारखी ती वरती  निमुळती होत जाते यावरून देखील त्याला दिवळी म्हणण्याचा प्रघात पडला असावा . सपराच्या दगडी भिंतीत दिवळी सुंदर दिसते . ती भिंतीत जास्तीत जास्त अर्धा फूट असू शकते . गावाकडे अजून दोन चार शब्द आढळतात .साधारण स्वयंपाकघरातून बैठकीच्या खोलीत बघण्यासाठी एक ते दोन इंच लांबी रुंदीचे एक आरपार भोक असायचे .त्याला 'झुरके' असा शब्द आहे . तर दूध आणि इ...